नवीन वर्षापासून कार महागणार!

    21-Dec-2024
Total Views |

cars

मुंबई (Honda Car Price): भारतामध्ये चारचाकी वाहणांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच आता गाड्या खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. येत्या जानेवारीपासून होंडा कंपनी आपल्या गाड्यांच्या किंमतीमध्ये २ टक्क्यांची वाढ करणार आहे. भारतामध्ये होंडा कंपनीच्या अमेझ, सीटी, आणि एलीव्हेट या गाड्यांना सर्वाधिक मागणी असते.

जानेवारी २०२५ पासून होंडा गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ होणार असल्याची माहिती कंपनीचे उपाध्यक्ष कुणाल बहल यांनी ही माहिती दिली. कच्चा माल आणि इतर गोष्टींच्या किंमती वाढल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती त्यांनी दिली. ग्राहकांना खर्चाचा कमीत कमी फटका बसावा या साठी आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती सुद्धा बहल यांनी दिली. होंडा कंपनी ही एकटीच दरवाढ करणारी कंपनी नसून मारूती सुझुकी, हुंडाई, टाटा मोटर्स, यांनी सुद्घा दरवाढीची घोषणा केली आहे.