मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटांच्या चर्चांवर आता पुर्णविराम लागला आहे. आराध्या बच्चनच्या शाळेत एका कार्यक्रमादरम्यान अभिषेक-ऐश्वर्याने एकत्र येत आपल्या मुलीला प्रोत्साहन दिले. याशिवाय सोबत अमितभा बच्चन आणि ऐश्वर्याच्या आईची उपस्थिती घटस्फोटांच्या चर्चा बंद करणाऱी ठरली. सध्या, बच्चन कुटुंबाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. यापैकी आराध्याच्या शाळेत ऐश्वर्या आणि अभिषेक सोबत वृंदा राय आल्या होत्या. यावेळी आराध्या, ऐश्वर्या आणि वृंदा यांना एकत्र पाहून नेटकरी आनंदी झाले आहेत.
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अॅन्युअल डेसाठी शाहरुख खान, करीना कपूर, शाहीद कपूर, सैफ अली खान यांनी हजेरी लावली होती. ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चनदेखील लाडक्या लेकीचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी
ऐश्वर्याची आई वृंदा राय आराध्याच्या शाळेत गेल्या होत्या.
दरम्यान, सेलिब्रेशननंतर वृंदा राय, ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन एकत्र कॅमेऱ्यात कैद झाल्या. यावेळी ऐश्वर्या व आराध्या वृंदा राय यांची काळजी घेताना दिसल्या. या तीन पिढ्यांना एकत्र पाहून फिल्मीज्ञानच्या व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘ऐश्वर्या राय बच्चन ही आदर्श सून, आदर्श मुलगी व आदर्श आई आहे’. तर आणकी एका युजरने ‘ऐश्वर्याने तिच्या मुलीला खूप चांगले संस्कार दिले आहेत’, असे म्हटले आहे.