सार्वजनिक वाचनालय कल्याण येथे अंतर्गत ‘अनंत कथा-कविता’ कार्यक्रमाचे आयोजन

    21-Dec-2024
Total Views |

image
 
कल्याण : १६० वर्षे शतकोत्तर अविरत वाचनसेवा देणाऱ्या सार्वजनिक वाचनालय, कल्याण आणि कल्याण डोंबिवली महनगरपालिका यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित पु. भा. भावे व्याख्यानमाले अंतर्गत ‘अनंत कथा-कविता’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सार्वजनिक वाचनालय कल्याण येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात अनंत जोशी सादरीकरण करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून अधिकाधिक साहित्यप्रेमींनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.