मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Netra Kumbh 2025 Prayagraj) उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे जानेवारी महिन्यात 'महाकुंभ २०२५'ला सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने प्रयागराज येथे भाविक येण्यास सुरुवात झाली आहे. परमेश्वराने निर्माण केलेली ही सुंदर सृष्टी १०० वर्षे प्रत्येकाला पाहता यावी, या उद्देशाने यंदाच्या महाकुंभामध्ये 'नेत्रकुंभ २०२५' ही आयोजित करण्यात आला आहे. ‘पश्येम् शारदाह शतम्’ असे या नेत्रकुंभाचे ब्रीदवाक्याचे ब्रीदवाक्य आहे.
हे वाचलंत का? : महाकुंभात यंदा पहिल्यांदाच 'दंतकुंभा'चे आयोजन
नेत्रकुंभाच्या माध्यमातून मोफत नेत्रतपासणी, औषधे, चष्मे वाटप आणि सर्व प्रकारचे ऑपरेशन्स असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 'सक्षम', 'द हंस फाऊंडेशन', 'स्वामी विवेकानंद हेल्थ मिशन', 'श्री भाऊराव देवरस न्यास', 'श्री रज्जू भैय्या सेवा न्यास, 'नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशन' आणि 'सेवा भारती' आदी विविध संस्थांच्या सहकार्याने नेत्रकुंभ मोठ्या स्तरावर संपन्न होणार आहे. नेत्रकुंभाच्या निमित्ताने २०१९ मध्ये प्रथमच प्रयागराजमध्ये नेत्र कुंभ आयोजित करण्यात आला होता, जिथे २ लाखांहून अधिक भाविकांना त्यांचे डोळे तपासण्याचा बहुमान मिळाला. यामध्ये १ लाख ५५ हजार हून अधिक लोकांना मोफत चष्म्याचे वाटपही करण्यात आले होते.