युनूस सरकारचा पर्दाफाश! हिंसाचाराची २,२०० प्रकरणे उघडकीस

21 Dec 2024 12:55:30

Muhammad Yunus

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Muhammad Yunus Bangladesh)
बांगलादेशात इस्लामिक कट्टरपंथींकडून हिंदू व इतर अल्पसंख्याकाना टार्गेट करत त्यांच्यावरील हल्ल्यांच्या घटना वाढताना दिसत आहेत. याबाबत केंद्र सरकारने राज्यसभेत शुक्रवारी धक्कादायक खुलासा केला आहे. बांगलादेशमध्ये यावर्षी ८ डिसेंबरपर्यंत हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांविरुद्ध हिंसाचाराची २,२०० प्रकरणे नोंदवली गेली असल्याचे समोर आले आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी मानवाधिकार संघटनांच्या आकडेवारीचा हवाला देत याबाबत सविस्तर माहिती दिली.

हे वाचलंत का? : अमेरिकेत हिंदूंचा अलौकिक सन्मान! ऑक्टोबर महिना 'हिंदू वारसा महिना' म्हणून होणार साजरा

राज्यसभेत लेखी उत्तरात कीर्ती वर्धन सिंह यांनी सांगितले की, या वर्षी ऑक्टोबरपर्यंत पाकिस्तानमध्ये हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांविरुद्ध हिंसाचाराची ११२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गेल्या वर्षी बांगलादेशात अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या ३०२ घटना घडल्या, तर पाकिस्तानमध्ये २०२३ मध्ये अशा १०३ घटना घडल्या आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेश वगळता इतर शेजारी देशांमध्ये अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराची कोणतीही घटना नोंदलेली नाही.

पुढे त्यांनी स्पष्ट केले की, 'भारत सरकारने पाकिस्तानला धार्मिक असहिष्णुता, जातीय हिंसाचार, अल्पसंख्याक समुदायांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. भारत आंतरराष्ट्रीय मंचांवर पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांच्या दुरावस्थेवर प्रकाश टाकत आहे. त्याचबरोबर सरकारने आपल्या चिंता बांगलादेश सरकारला सांगितल्या आहेत. ९ डिसेंबर रोजी परराष्ट्र सचिवांच्या बांगलादेश दौऱ्यातही याच गोष्टीचा पुनरुच्चार करण्यात आला होता.

Powered By Sangraha 9.0