दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी निघणार नांदेडहून दिंडी

21 Dec 2024 16:51:36

sahitya sanmelan
दिल्ली : सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत होणार असून दिल्ली येथे होणार असून या संमेलनासाठी नांदेडहून भक्त नामदेव ग्रंथ दिंडी निघणार आहे.
 
संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी घुमान येथे २०१५ मध्ये झालेल्या ८८ व्या मराठी साहित्य संमेलना नंतर आता दिल्लीत ९८ वे संमेलन भरविले जात आहे. घुमान साहित्य संमेलनात नांदेडच्या नानक साई फाऊंडेशनला ग्रंथ दिंडी काढण्याचा मान मिळाला होता. घुमान संमेलनात काढलेली 'भक्त नामदेव ग्रंथ दिंडी' खूप लोकप्रिय झाली होती. दिल्लीच्या साहित्य संमेलनात ही ग्रंथ दिंडी काढण्याची संधी नानक साई फाऊंडेशनला प्राप्त झाली आहे. नानक साई फाऊंडेशन महाराष्ट्र- पंजाब भागात करीत असलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याबद्दल साहित्य महामंडळ व सरहद्द संस्थेने समाधान व्यक्त केले आहे. नांदेड हून निघणारी ग्रंथ दिंडी दिल्लीत येऊन मुख्य दिंडी मध्ये सहभागी होणार आहे. ग्रंथ दिंडी मध्ये साहित्यिक व साहित्य प्रेमींनी सहभागी होण्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन नानक साई फाऊंडेशनचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0