मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांनी इतिहास रचला आणि याच इतिहासात मोलाचा वाटा उचलला तो स्वदेस या चित्रपटाने. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि शाहरुख खान अभिनित स्वदेस हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. पण आजही २०२४ मध्ये चित्रपटाची कथा, गाणी कालबाह्य वाटत नाहीत. या चित्रपटातील एक गाणं आजही खुप लोकप्रिय आहे ते म्हणजे 'ये जो देस है तेरा'. याच गाण्यावर अबरामच्या शाळेतील मुलांनी डान्स केला तेव्हा शाहरुखची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
अबरामच्या शाळेत नुकतचं वार्षिक स्नेहसंमेलन झालं. यावेळी अनेक स्टारकिड्सच्या मुलांनी खास परफॉर्मन्स केले. शाहरुख खानही त्याच्या कुटुंबासोबत धाकटा लेक अबरामलासाठी उपस्थित होता. त्यावेळी अबरामच्या शाळेतील मुलांनी शाहरुखच्या 'स्वदेस' चित्रपटातील 'ये जो देस है तेरा' गाण्यावर डान्स केला. हा डान्स बघून शाहरुख काहीसा भावुक झालेला दिसला. याशिवाय त्याने डान्स करणाऱ्या मुलांना दाद दिली.
शाहरुख खान परिवावासह अबरामच्या शाळेतील या कार्यक्रमाला हजर होता. त्यावेळी अबरामने एका नाटकात स्नोमॅनचं देखील काम केलं. त्यात आराध्या अभिषेक बच्चन हिने देखील काम केलेलं दिसलं. दरम्यान, या शाळेतील वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमात शाहरुखचा लेक अबराम, ऐश्वर्या - अभिषेकची मुलगी आराध्या, करीना-सैफचा मुलगा तैमूर याशिवाय शाहिद-मीरा कपूरची मुलगी मिशा यांनीही परफॉर्मन्स केले होते.