बुलेट ट्रेन बांधकाम साइट्सवर १०० नुक्कड नाटकांद्वारे १३,००० हून अधिक कामगारांसाठी सुरक्षा जनजागृती

20 Dec 2024 12:58:42
Nukkad Natak

मुंबई : अहमदाबाद बुलेट ट्रेन ( Bullet Train ) प्रकल्पाच्या बांधकामस्थळी कामगारांच्या (श्रमिक) सुरक्षिततेसाठी नुक्कड़ नाटकांची मालिका असलेल्या 'प्रयत्न' या जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. एमएएचएसआर कॉरिडॉरसह १०० हून अधिक बांधकाम साइट्सवरील १३,००० हून अधिक कामगारांपर्यंत ही मोहीम पोहोचली.

यावर्षी जून आणि डिसेंबर महिन्यात दोन भागांची मालिका घेण्यात आली होती. या नुक्कड़ नाटकांच्या आयोजनाचा मुख्य हेतू हा होता की, कामगारांना आकर्षक आणि संवादात्मक स्वरूपाद्वारे बांधकाम साइट्सवरील सुरक्षिततेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढविणे आणि शिक्षित करणे. अपघात रोखण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य-कल्याणाचे रक्षण करू शकणाऱ्या प्रमुख सुरक्षा उपायांवर भर देताना कामगारांना गुंतवून ठेवणे आणि शिक्षित करणे हे या प्रदर्शनाचे उद्दीष्ट होते.

कामगारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि सुरक्षिततेचे संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सुरक्षा उपकरणांचा योग्य वापर, सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन, आपत्कालीन प्रतिसाद प्रोटोकॉल, उंचीवर सुरक्षिततेची खबरदारी आणि सुरक्षित कामाचे वातावरण राखण्याचे महत्त्व असे आवश्यक सुरक्षा विषय नाटकांमध्ये दाखविण्यात आले.

बुलेट ट्रेनच्या बांधकाम साइट्सवर काम करणारे कामगार देशाच्या वेगवेगळ्या भागातून येतात, वेगवेगळ्या भाषा आणि बोली भाषा बोलतात. या वैविध्यपूर्ण मनुष्यबळापर्यंत सुरक्षिततेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी पथनाट्यांमध्ये वापरली जाणारी भाषा सोपी, स्पष्ट आणि सर्वांना समजेल अशी ठेवण्यात आली.

या मोहिमेत सर्व कास्टिंग यार्ड, बोगदा शाफ्ट, निर्माणाधीन स्टेशन, डेपो, पूल आणि व्हायाडक्टचा समावेश होता.

Powered By Sangraha 9.0