मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक बचच्न आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या नात्यात दुरावा आला आहे अशा बातम्या जोर धरत होत्या. अनेक कार्यक्रमांना ते दोघे एकत्रित उपस्थित राहात नसल्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण नुकताच आराध्या अभिषेक बच्चनच्या शाळेत झालेल्या एका कार्यक्रमाला अभिषेक, ऐश्वर्य़ा आणि अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावून या चर्चांना काहीही न बोलता पुर्णविराम दिला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी मुलं धीरुभाई अंबानी शाळेत शिकतात. त्याच शाळेत ऐश्वर्या-अभिषेकची मुलगी आराध्या देखील शिकते. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात बहुतांश सगळ्याच शाळांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन होते आणि त्याचप्रमाणे धीरूभाई अंबानी शाळेमध्ये देखील शालेय मुलांसाठीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शाळेतील सगळी मुलं आपलं कलाकौशल्य सादर करताना दिसली आणि त्यांच्या कलेला पालकांनी प्रोत्साहन दिले. याचनिमित्ताने आपल्या लेकीला प्रोत्साहन देण्यासाठी अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र आले होते. यावेळी आराध्याचे आजोबा आणि महानायक ‘बिग बी’ सुद्धा उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळेचे फोटो व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. यापैकी एका फोटोत
अभिषेक ऐश्वर्याच्या ड्रेसची ओढणी सावरत असल्याचं पाहायला मिळतं आहे तर एका व्हिडिओत गर्दीत धक्का लागू नये यासाठी अभिषेक ऐश्वर्याची विशेष काळजी घेताना दिसला. यावरून दोघांमध्ये सर्वकाही उत्तम असून ऐश्वर्या-अभिषेक एकमेकांबरोबर आनंदी असल्याचं स्पष्ट झालं आहे.
अभिषेक बच्चनच्या या कृतीवर नेटकरी प्रचंड आनंदी झाले असून त्यांनी ऐश्वर्या-अभिषेकच्या या व्हायरल व्हिडीओ कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तसेच, चाहत्यांनी अनेक महिन्यांनी दोघांना एकत्र पाहून आनंद व्यक्त केला आहे.