Vanvasi Kalyan Ashram tribute to Tulsi Gauda
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : अ.भा. वनवासी कल्याण आश्रमची केंद्रीय कार्यकारी मंडल बैठक नुकतीच मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे संपन्न झाली. त्यावेळी वृक्षमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या कर्नाटकातील पद्मश्री तुलसी गौडा यांनी श्रद्धांजली वाहिली. या बैठकीला देशभरातील प्रतिनिधीं उपस्थित होते. त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली आणि भविष्यातील कार्यक्रमांची आखणी केली. यावेळी वनवासी कल्याण आश्रमाचा स्थापना दिवस २६ डिसेंबर रोजी देशभरात साजरा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रयागराज येथे आयोजित महाकुंभात हजारो जनजातीय बांधवांचे पवित्र स्नान होणार असल्याची माहितीही बैठकीदरम्यान देण्यात आली.