मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Pravin Togadiya on Jihadi) उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे महाकुंभ २०२५ च्या निमित्ताने एक कार्यक्रम संपन्न झाला होता. यावेळी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी "अब तेरा क्या होगा कालिया..." असे म्हणत शोले स्टाईलमध्ये यावेळी इस्लामिक कट्टरपंथींवर हल्लाबोल केला. दरम्यान उपस्थित हिंदूंनी केवळ हिंदू व्यक्तीकडूनच फळ-भाज्या विकत घेणार, केस कापून घेणार, हिंदू व्यक्तीच्याच रिक्षेतून प्रवास करणार, गाडी-स्कुटर-फ्रीज-टीव्ही हे सुद्धा हिंदू व्यक्तीकडूनच दुरुस्त करून घेणार, रोजगारही हिंदूंनाच देणार याबाबत शपथ घेतली.
हे वाचलंत का? : अमेरिकेत हिंदूंचा अलौकिक सन्मान! ऑक्टोबर महिना 'हिंदू वारसा महिना' म्हणून होणार साजरा
मंचावरून शपथ देताना कुठल्याही समाजाचे नाव न घेता प्रवीण तोगडिया म्हणाले, "भारतातील हिंदूंच्या रक्षणासाठी आम्ही आर्थिक शस्त्रांचा वापर करू. आज हिंदूंच्या हातात ते आर्थिक शस्त्र आहे. प्रत्येकाने आठवड्यातून किमान दोनदा म्हणजे मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालीसा पठण करावे. अशा परिस्थितीत शंभर हिंदू त्याच्याशी स्पर्धा का करू शकत नाही?'