मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bangladesh Crisis) बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्याकांवरील वाढत्या अत्याचार प्रकरणी हिमाचल प्रदेशातील प्रमुख सामाजिक, धार्मिक आणि मानवाधिकार संघटनांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना पत्र लिहिले आहे. सदर पत्र संबंधित राज्यपालांना सुपूर्द करण्यात आले असून राज्यपालांनी ते पत्र राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवणार असल्याचे आश्वासन दिले. 'डिफेंडर्स ऑफ ह्युमन राइट्स' या संघटनेच्या बॅनरखाली विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राजभवन येथे राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांची भेट घेतली. दरम्यान बांगलादेशातील हत्या, बलात्कार, जाळपोळ आणि मंदिरांची नासधूस यावर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली.
हे वाचलंत का? : भारत विश्वगुरू होण्याचे स्वप्न येत्या २० वर्षात गाठेल!
बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कांच्या गंभीर उल्लंघनाच्या घटनांचा संयुक्त राष्ट्रांनी उघडपणे निषेध करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याशिवाय बांगलादेशात एक उच्चस्तरीय देखरेख समिती स्थापन करण्यात यावी ज्याने तिथल्या अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांबाबत संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला तात्काळ माहिती द्यावी.
बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांवर त्यांचे जीवन, प्रतिष्ठा आणि मंदिरे आणि इतर सांस्कृतिक प्रतीकांचे रक्षण करण्यासाठी आणि नष्ट झालेल्या प्रार्थनास्थळांची पुनर्बांधणी सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्याची मागणी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांकडे करण्यात आली आहे.