अमेरिकेत हिंदूंचा अलौकिक सन्मान! ऑक्टोबर महिना 'हिंदू वारसा महिना' म्हणून होणार साजरा

    20-Dec-2024
Total Views |

USA-Bharat

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Hindu Virasat Mah in USA) 
अमेरिकेच्या ओहायो राज्यात ऑक्टोबर महिना हा 'हिंदू वारसा महिना' म्हणून साजरा केला जाणार आहे. ओहायो स्टेट हाऊस आणि सिनेटने नुकतेच याबाबत एक विधेयक मंजूर केले आहे. हा ओहायो आणि देशभरातील हिंदूंचा मोठा विजय असल्याचे राज्याचे सिनेटर नीरज अँटनी यांनी म्हटले आहे. ओहायो आणि देशभरातील हिंदू वकिलांनी केलेल्या कामाचे हे फळ आहे, असेही ते म्हणाले. अँटनी हे ओहायोचे पहिले हिंदू आणि भारतीय अमेरिकन स्टेट सिनेटर आहेत.

हे वाचलंत का? : बांगलादेशातील अत्याचार थांबवा; संयुक्त राष्ट्राकडे होतेय हस्तक्षेपाची मागणी

ॲडम मॅथ्यू पुढे म्हणाले की, "ओहायोमध्ये लाखो लोक आहेत ज्यांची स्वतःची पार्श्वभूमी आहे. आता हे विधेयक राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठवले जाईल." हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने या विधेयकाचे स्वागत केले आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिना अधिकृतपणे हिंदू वारसा महिना ओळखून, एचबी १७३ हे सुनिश्चित करते की ओहायोवासीयांना हिंदू अमेरिकन लोकांचे योगदान, संस्कृती आणि परंपरा अधिक चांगल्या प्रकारे समजतात", असे फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक समीर कालरा म्हणाले. भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण संबंध उत्कृष्ट आणि रोमांचक असल्याचे अमेरिकेचे संरक्षण विभाग पेंटागॉनने म्हटले आहे.