मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (ABVP Pradesh Adhyaksha Mantri) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोंकण प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. श्रीकांत दुदगीकर पुनर्निर्वाचित झाले असून प्रदेश मंत्री म्हणून राहुल राजोरिआ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती वर्ष २०२४-२५ साठी झाली असून सदर घोषणा निर्वाचन अधिकारी ॲड. सौ. सुषमा प्रभुखानोलकर यांनी मुंबई येथे केली. दि.२७ ते २९ डिसेंबर या कालावधीत सावंतवाडी येथे होणाऱ्या अभाविप कोंकण प्रदेशाच्या ५९व्या प्रदेश अधिवेशनामध्ये प्रा. श्रीकांत दुदगीकर व राहुल राजोरिआ आपापला पदभार स्वीकारतील.
हे वाचलंत का? : प्रवीण तोगडियांचा 'शोले' स्टाईलमध्ये जिहाद्यांवर हल्लाबोल! प्रा. श्रीकांत रमेश दुदगीकर २०१३ पासून अभाविपच्या कार्यात आहेत. यापूर्वी रत्नागिरी शहर उपाध्यक्ष, रत्नागिरी शहर अध्यक्ष, कोंकण प्रदेश उपाध्यक्ष, वर्ष २०२१ पासून कोंकण प्रदेश अध्यक्ष अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सध्या रत्नागिरी विभाग प्रमुख आणि कोंकण प्रदेश अध्यक्ष अशी जबाबदारी आहे. वर्ष २०२४ - २५ साठी कोंकण प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांचे पुनर्नियुक्ती झाली आहे.
श्री राहुल गिरिधारी राजोरिआ मुळ रत्नागिरी मधील कार्यकर्ता आहेत. २०१७ पासून अभाविपच्या संपर्कात आहेत, २०२३ पासून विद्यार्थी विस्तारक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी रत्नागिरी शहर मंत्री, दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक व रत्नागिरी विभाग संयोजक अश्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सध्या कोंकण प्रांत सहमंत्री आणि उत्तर रायगड जिल्हा विद्यार्थी विस्तारक अशी आपल्याकडे जबाबदारी आहे.