केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन महाराष्ट्र भाजपसाठी निरिक्षक

02 Dec 2024 17:43:14
Nirmala Sitaraman

नवी दिल्ली : भाजप विधीमंडळ नेता निवडीच्या बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Nirmala Sitaraman ) आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची केंद्रीय निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी भाजपने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. पक्षाने जारी केलेल्या निवेदनात ही घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पक्षाच्या संसदीय मंडळाने विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांची महाराष्ट्रातील पक्ष विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला असून २८८ सदस्यीय विधानसभेत महायुतीने २३० जागा जिंकल्या आहेत. भाजपने सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या, तर शिवसेनेला ५७ आणि नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या आहेत.

Powered By Sangraha 9.0