बांगलादेशात श्याम दास प्रभू यांना विनावॉरंट अटक

02 Dec 2024 17:19:24

Bangladeshi Hindu
 
ढाका : बांगलादेशात हिंदूंवरील (Bangladeshi Hindu) अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी चितगाव पोलिसांनी हिंदू पुजारी श्री श्याम दास प्रभू यांना अटक केली आहे. इस्कॉनचे दास यांनी याप्रकरणाची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. चिन्मय दास यांना २५ नोव्हेंबर रोजी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र आता याप्रकरणानंतर एका बांगलादेशी हिंदूला विनावॉरंट पकडण्यात आले असल्याची माहिती आहे.
 
 
 
श्री श्याम दास प्रभू चिन्मय दास यांना भेटण्यासाठी तुरूंगात गेले असता, त्यांना पकडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. अटक करण्यासाठी ज्या वॉरंटची आवश्यकता असते, तेच वॉरंट अधिकृतरित्या दिले गेले नसून त्यांना अटक करण्यात आली आहे. एकीकडे प्रशासन हिंदूंना अटक करण्यात आणि त्यांच्यावर अत्याचार करण्यासाठी व्यस्तच असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे बांगलादेशात कट्टरपंथी सोशल मीडियावर उघडपणे हिंदूंना मारण्याचे आवाहन करत आहेत. इस्लामिक कट्टरतावादी सोशल मीडियावर टोटल मलाऊन डेथ म्हणजे सर्व हिंदूंना मारले जावे, अशा हॅशटॅगसह पोस्ट शेअर करत असल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
 
संबंधित हॅशटॅगचा वापर करत एकूण २००००० हून अधिक पोस्ट शेअर केल्या गेल्या आहेत. असे कृत्य करणारे लोक केवळ आणि केवळ कट्टरपंथी आहेत. दरम्यान या हॅशटॅगचा वापर हा केवळ पहिल्यांदा नाहीतर याआधी अनेकदा करण्यात आला होता. हिंदूंविरोधात कट्टरपंथी एक यावे या हेतूने हे कृत्य केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
बांगलादेशी इस्लामिक कट्टरवाद्यांनी हिंदूंविरोधात असा द्वेष निर्माण करत हिंदूंच्या चिंतेत वाढ निर्माण झाली आहे. हिंदुत्वविरोधी घटनानंतर सरकारची आजवरची वृत्ती पाहिल्यास लक्षात येते की, अशा घटनांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. इस्कॉनप्रकरणी अनेकांना अटक केली जाते. मात्र अन्याय करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे बांगलादेशातील वास्तव हे नाकारता येणारे नाही.
 
Powered By Sangraha 9.0