लखमापूर : उत्तर प्रदेशातून लखमापूर येथील एका गावातील विधवा महिलेने भीतीपोटी आपले राहते घर सोडून पलायन करावे लागल्याची घटना घडली आहे. तिने त्या पोस्टरवर कट्टरपंथींमुळे त्रास होत असून मला नाविलाजाने घर सोडायचे आहे. हे घर विक्रीसाठी असल्याचे डीएमकडे तक्रार केली होती. यावेळी काही कट्टरपंथींनी तिच्या मोठ्या मुलीचे एक दोनदा नाहीतर तब्बल तीन वेळा अपहरण केले आणि लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केले असून तिला धमकीही देण्यात आली आहे.
यादरम्यान डीएमने दिलेल्या एका तक्रारीत असे लिहिले की, "कट्टरपंथीबहुल असलेल्या गावात एकच हिंदू कुटुंब आहे. एप्रिल २०२४ मध्ये तिच्या पतीचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे. पीडित विधवा महिलेला दोन मुली आणि एक मुलगा आहे. मोठ्या मुलीचा विवाह झाला असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. माजी प्रधान घुरे यांचा नातू मोहम्मद इम्रान याने पीडित विधवा महिलेच्या थोरल्या युवतीचे अपहरण केले. तर याप्रकरणाची पोलिसांनी दखल घेत इम्रान पुन्हा एकदा त्यांच्यासोबत पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेत इम्रानवर गुन्हा दाखल केला आहे. "
दरम्यान संबंधित प्रकरणात महिलेने आरोप केला की, कट्टरपंथींनी पीडित महिलेच्या लहान मुलालाही अपहरण करण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.