मुंबई : भारतीय पौराणिक कथांच्या चित्रणासाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध चित्रकार सुकांत दास यांच्या चित्रांचे प्रदर्शन ‘अहम’ हे प्रदर्शन लवकरच मुंबईतील ‘ताज आर्ट गॅलरी’ येथे भरणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘ताज आर्ट गॅलरीमध्ये येथे होणार आहे. उद्घाटनानंतर २० डिसेंबर पर्यंत ताज आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन प्रेक्षकांना सकाळी १० ते रात्री ८:३० या वेळेत प्रेक्षकांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे. ताज आर्ट गॅलरीमध्ये दोन दिवसांचे प्रदर्शन झाल्यानंतर ‘सुअन आर्टलँड गॅलरी, G-16, कॉमर्स हाऊस, काला घोडा, मुंबई’ येथे हे प्रदर्शन हलवण्यात येणार आहे. सुअन आर्टलँड गॅलरीमध्ये २१ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ६:३० वाजेपर्यंत हे प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुले राहील.
सुकांत दास हे समकालीन चित्रकलेतील एक प्रसिद्ध चित्रकार आहेत. त्यांच्या चित्रात फक्त पौराणिक कथांचे पारंपारिक पद्धतीने केलेले नसते तर त्यात आधुनिकतेचे रंग भरलेले असतात. पौराणिक कथा आणि आधुनिक काळ यांचा संगम त्यांच्या चित्रांमध्ये साधलेला असतो. त्यांच्या ‘अहम’ या प्रदर्शनात महाभारत, रामायण या महाकाव्यांसह पुराणातील दंतकथेपासून प्रेरित चित्रे दिसणार आहेत.
"भारतीय पौराणिक कथा नेहमीच माझ्यासाठी प्रगल्भ प्रेरणास्रोत आहेत. आजच्या प्रेक्षकांसाठी या कथांची पुनर्व्याख्या करण्याचा, त्यांच्या प्रतीकात्मकतेच्या स्तरांचा शोध घेण्याचा आणि त्यांच्या दीर्घकालीन प्रासंगिकतेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मी माझ्या चित्रांमधून केला आहे." अशी प्रतिक्रिया सुकांत दास यांनी दिली आहे.