मुंबई : ‘नृत्य दर्पण अकॅडमी ऑफ फाईन आर्ट्स’ तर्फे स्फूर्ती २०२४’ या भारतीय नृत्यकलेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार २१ डिसेंबर रोजी दादर येथील वीर सावरकर सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. नवोदित कलाकारांना संधी व व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच युवा पिढीमध्ये भारतीय कलेविषयी आस्था निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणुन ‘नाट्य कलाशिखमणी डॉ. जयश्री राजगोपाल’ उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमात लावणी सम्राट अश्मिक कामटे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. भरतनाट्यम, कथ्थक आणि ओडिसी असे विविध नृत्यप्रकार या कार्यक्रमात समाविष्ट आहेत. पुढच्या वर्षी कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून आम्ही लोकनृत्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा नृत्य दर्पण अकॅडमी ऑफ फाईन आर्ट्सचा’ विचार आहे. अधिकाधिक नृत्यप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.