ठाणे : शिवशंभू विचार मंच, कोकण प्रांत तर्फे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार २१ डिसेंबर रोजी ‘मराठी ग्रंथ संग्रहालय, १ ला मजला, कै. वा. अ. रेगे सभागृह, ठाणे जिल्हा परिषदेसमोर, ठाणे (प)’ येथे सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. अभय जगताप या कार्यक्रमात व्याख्याते असणार असून ‘अहिल्यादेवी होळकर जीवनदर्शन’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय असणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिलीप बलसेकर उपस्थित राहणार आहेत. ‘हेमाद्री’ या मोडीलिपीतील हस्तलिखिताच्या विशेषांकाचे प्रकाशन सुद्धा या कार्यक्रमात होणार आहे. अधिक माहितीसाठी पंकज भोसले (९८२१००९१३७) यांच्याशी संपर्क साधावा.