स्त्रियांच्या प्रश्नांवर ज्वलंत भाष्य! बोरीवलीत रंगणार ‘साती साती पन्नास’ नाटकाचे प्रयोग

19 Dec 2024 18:27:07
 
natak
 
मुंबई : ‘सृजन द क्रियेशन’ या नवोदित कलाकारांसाठी काम देणाऱ्या संस्थेतर्फे ‘साती साती पन्नास’ या स्त्रियांच्या प्रश्नांवर ज्वलंत भाष्य करणाऱ्या नाटकाचे प्रयोग दिनांक रविवार २२ डिसेंबर ते गुरुवार २६ डिसेंबर या कालावधीत सायंकाळी ७ वाजता ‘ॲक्टिव्हिटी सेंटर, श्रीकृष्ण नगर, बोरिवली (पूर्व) येथे आयोजित करण्यात आले आहेत. ज्येष्ठ लेखक संजय पवार लिखित या नाटकाचे दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केले आहे. श्रद्धा नांदूर्डीकर यांनी नाटकाच्या संगीताची धुरा सांभाळली असून नृत्यदिग्दर्शन सिद्धेश दळवी यांनी केले आहे. श्रद्धा माळवदे, चैताली जोशी, गीता पेडणेकर, अर्चना पाटील, गौरवी भोसले, स्वरांगी जोशी, निनाद चिटणीस या कलाकारांची या नाटकात भूमिका आहे. शिवशाही कला क्रिडा केंद्र यांचे विशेष सहकार्य यासाठी लाभले.
 
‘सृजन द क्रियेशन’ ही संस्था गेली चार वर्षे सातत्याने अनेक एकांकिका, नाटके, अभिवाचन, लघुपटांचे कार्यक्रम करत आहे. सर्व नाट्य रसिकांनी ह्या प्रयोगांचा आनंद घ्यावा असे संस्थेचे प्रमुख राजेश देशपांडे ह्यांनी आवाहन केले आहे.
Powered By Sangraha 9.0