पुण्यात पुस्तक प्रकाशन समारंभ आणि कविसंमेलनाचे आयोजन

    19-Dec-2024
Total Views |

pustak
 
पुणे : काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे व साईश इन्फोटेक अँड पब्लिकेशन्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुस्तक प्रकाशन समारंभ आणि कविसंमेलनाचे आयोजन शनिवार २१ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, निगडी, पुणे’ येथे करण्यात आले आहे. प्रकाशन कार्यक्रमाचे उद्घाटन साहित्यिक व पत्रकार पितांबर लोहार यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ साहित्यिक व संत चित्रकार वि. ग. सातपुते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. कवी-गायक आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष चव्हाण या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सीमा गांधी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
‘म्हणींचं म्हणणं’, ‘सापडलेली पत्रे’, ‘पहावे आपुल्या देशा-प्रवास वर्णन’, ‘मनमंथन-काव्यसंग्रह’, ‘हिसाब जज्बातों का-हिंदी काव्यसंग्रह’, ‘सफर बालनगरीची-काव्यसंग्रह’ इत्यादी पुस्तकांचे प्रकाशन या कार्यक्रमात होणार आहे.