मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dr Ambedkar and RSS) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणातील अर्धवट वाक्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. वास्तविक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करणे ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्कृती नाही. रा.स्व.संघ आणि डॉ. आंबेडकर यांच्यात वैचारिक साम्यता आपल्याला विविध ठिकाणी आढळून येईल. स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकदा 'संघ शिक्षा वर्गाला' हजेरी लावली होती व त्यावेळी त्यांचा बौद्धिक वर्गही झाला होता. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी त्यावेळचा किस्सा सांगितला आहे.
हे वाचलंत का? : संघाची शिकवण जोडणारी आहे तोडणारी नाही! : एकनाथ शिंदे
प्रभात प्रकाशनच्या एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधत सरसंघचालक म्हणाले की, १९३९ दरम्यान डॉ. हेडगेवारांना भेटायला डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका संघ शिक्षा वर्गात आले होते. भोजनाच्या वेळी ते अचानक आले आणि त्यांनी सर्व स्वयंसेवकांसह भोजन केले. त्यानंतर त्यांनी उपस्थित स्वयंसेवकांना प्रत्येकाची जात विचारली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, इथे विभिन्न जातीचे कार्यकर्ते याठिकाणी आहेत. त्यानंतर दुपारच्या सत्रात जो बौद्धिक वर्ग होणार होता, त्यास डॉ. हेडगेवारांनी रद्द केले आणि डॉ. आंबेडकरांचे भाषण ठेवले. 'भारत की दलित समस्या और दलितोद्धार' या विषयावर त्यांचे त्यावेळी बौद्धिक झाले होते.
म्हणून आंबेडकरांनी 'ते' पाऊल उचललं!
'हम हिंदू नहीं है, हम बौद्ध है, हिंदूओं से हमारा कोई संबंध नहीं' असे म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिक्षा पिरवर्तन केले होते. असे केल्याशिवाय त्यांना जे साध्य करायचं होतं ते ते करू शकले नसते, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं. ही भूमिका घेऊ नये याकरीता त्यांनी ४० वर्ष अतोनात प्रयत्न केले परंतु तेव्हा झोपलेला हिंदू समाज जागा झाला नाही, त्यामुळे त्यांना हे पाऊल उचलावे लागले.
डॉ. आंबेडकरांबाबत काय म्हणाले श्री गोळवलकर गुरुजी?
१९६३ मध्ये डॉ. आंबेडकरांवर एक गौरव विशेषांक प्रकाशित झाला होता. त्यात श्री गुरुजींनी लिहिले होते की, 'स्वामी विवेकानंद यांच्या म्हणण्यानुसार आदी शंकराचार्यंची प्रज्ञा आणि गौतम बुद्धांच्या हृदयातील करुणा यांचा संगम आपल्यात बाळगणारा व्यक्ती भारतात असेल तरच समाजाला योग्य दिसा मिळेल. मला असं वाटतं की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रुपात हा संगम आपल्याला प्राप्त झाला आहे."