हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेशिमबागेत

19 Dec 2024 11:32:40

Devendra Fadnavis at Reshimbag

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Devendra Fadnavis at Reshim Bagh)
महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होत आहे. अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशिमबाग कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक प.पू.डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू.श्री. गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीसही अभिवादन केले. दरम्यान सुरुवातीला भाजपच्या महिला कार्यकर्त्यांकडून त्यांचे औक्षणही करण्यात आले.


Devendra Fadnavis at Reshimbag

वडिलांकडून मिळाला संघाचा वारसा
देवेंद्र फडणवीस यांचे वडील स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस यांच्याकडून त्यांना मूळ संघाचा वारसा मिळाला. १९९० च्या दशकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत देवेंद्र फडणवीस सहभागी झाले. अभाविपचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी तळागाळातील राजकारण्यांसाठी काम केले. त्यानंतर ते भाजपचे प्रभाग समन्वयक झाले आणि येथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.
Powered By Sangraha 9.0