चेन्नई : तामिळनाडूतील कोयंबटूर येथे इस्लामी आतंकवादी एस ए बाशा याच्या अंत्ययात्रेला २००० पोलिस आणि २०० आरएएफ जवानांची तैनाती करण्यात आली. एसए बाशाला कोयंबटूरमध्ये १९९८ साली झालेल्या धमाक्याचा मास्टरमाइंड म्हणून ओळखले जाते. ज्याने ५८ भारतीयांना जीवे मारले त्या दहशतवाद्याच्या अंत्यविधीला स्टॅलिन सरकारच्या ( Stalin Govt. ) अनेक आमदार-नेते-अभिनेते आणि अल्पसंख्याक जमावाने हजेरी लावली. तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला.
१९९८ साली कोयंबटूर येथे बॉंम्बस्फोट झाले होते. यामध्ये ५८ लोकांनी आपला जीव गमावला होता, तर ३२१ लोक गंभीर जखमी झाले होते. या धमाक्यांच्या मागे अल-उम्मा नावाची कट्टरपंथी संघटना होती, जिला पुढे बंदी घालण्यात आली होती. एस ए बाशा या संघटनेचा प्रमुख होता. या संपुर्ण सीरियल ब्लास्टच्या कर्ता-धर्तांपैकी एक होता. त्याला जन्मठेपेची शिक्षा मिळाली होती. २००३ मध्ये त्याने गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनाही जीवेमारण्याची धमकी दिली होती. एस ए बाशा याचा सोमवार १६ डिसेंबर २०२४ रोजी रुग्णालयात मृत्यू झाला आणि त्याला १७ डिसेंबर २०२४ रोजी दफन करण्यात आले.
एस ए बाशाने तामिळनाडूला बऱ्याच वेळा आतंकी हमल्यांचे शिकार बनवले असूनदेखील १७ डिसेंबर २०२४ रोजी त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी हजारो लोक जमले होते. एखाद्या अभिनेत्याप्रमाणे त्याला अखेरचा निरोप देण्यात आला. त्याच्या अंतिम यात्रेला आमदार, नेते, अभिनेते यांनी आपली उपस्थिती दाखवली होती. यामध्ये एनटी नेता व अभिनेता सीमान, यू थानियारसू, वन्नी अरासू, पी अब्दुल समस हे व यांसारखे अनेक छोटे-मोठे नेते या अंत्ययात्रेत सामील होते. या यात्रेला भाजपने विरोध केला होता. डीएमके सरकारने या आतंकवाद्याची अंत्ययात्रा तर काढलीच परंतु ती सुरळीत पार पडावी म्हणून तिथे पोलिसही तैनात केले.