घुसखोर बांगलादेशींवर कारवाई, ठाण्यात एक तर भिवंडीत दोघांना अटक
18-Dec-2024
Total Views |
ठाणे : (Bangladeshi) बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश केलेल्या बांग्लादेशीवर कारवाई सुरू केली आहे. ठाण्यातील मनोरमा नगर येथे आयुर्वेदीक औषधांचा बाजार मांडून नागरिकांना गंडवणाऱ्या एकाला तर भिवंडीत दोन बांग्लादेशीना पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ठाण्यात मनोरमा नगर येथे शिरअली मोहम्मद शेख हा बांग्लादेशी स्वतः रोगी असून हा सगळ्यांना आयुर्वेदिक औषधे विकून गंडवत होता. भाजपचे दत्ता घाडगे यांनी त्याला पकडून कापूरबावडी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.भिवंडी येथील खोका कंपाऊंड परिसरातील झोपडपट्टीमध्ये भाड्याच्या खोलीत वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशींना भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. रमजान शेख (३२) आणि कबीर शेख (४०) अशी या बांगलादेशींची नावे आहेत. दोघेही बांगलादेशातील नानपुर भागातील आहेत. दोघेही भिवंडी शहरात नळ जोडणीचा व्यवसाय करत होते. त्यांच्याविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात पारपत्र अधिनियम १९२० चे कलम ३,४ सह विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १३,१४ अ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांनी भारतात प्रवेश कसा मिळविला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.