चिन्मय कृष्ण दास यांचे वकील रवींद्र घोष भारतात; केले धक्कादायक खुलासे!

18 Dec 2024 13:27:03

Adv. Ravindra Ghosh

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ravindra Ghosh in India)
बांगलादेशमध्ये इस्लामिक कट्टरपंथींकडून अल्पसंख्याकांवर हल्ले झाल्याची एक हजारहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याबाबतचा धक्कादायक खुलाला बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील रवींद्र घोष यांनी केला आहे. इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास यांच्याबाजूने वकिली केल्याप्रकरणी बांगलादेश न्यायालयात त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्यांना जिवे मारण्याची धमकीही कट्टरपंथींकडून देण्यात आली होती. त्यानंतर उपचारासाठी नुकतेच ते भारतात आले असता, त्यांनी माध्यमाशी बोलताना सदर खुलासा केला आहे.

हे वाचलंत का?: 'समाजसेवेद्वारे स्वावलंबी गावे' हेच भारताचे व्हिजन : दत्तात्रेय होसबळे

रवींद्र घोष यांनी सांगितले की, ते वैद्यकीय तपासणीच्या निमित्ताने कोलकाताजवळील बराकपूर येथे आपल्या मुलाकडे आले आहेत. यावेळी त्यांनी बांगलादेशात अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्याची एक हजारहून अधिक प्रकरणे असल्याचे सांगत ते सर्व पीडितांसाठी लढतील, असा ठाम विश्वास त्यांनी दिली आहे.


पुढे त्यांनी हे सुद्धा सांगितले की, इस्कॉनचे संत चिन्मय कृष्ण दास हे बांगलादेशच्या 'समिलित सनातनी जागरण जोते'चे प्रवक्ते असून नोव्हेंबर महिन्यात त्यांना ढाका विमानतळावरून अटक करण्यात आली होती. त्याच्यावर देशद्रोह आणि इतर खोटे आरोप लावण्यात आले आहेत. बांगलादेशचे अंतरिम सरकार आणि कट्टरवाद्यांनी त्यांना लक्ष्य केले कारण ते हिंदू समाजाचे संघटन करत होते आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचारांवर आवाज उठवत होते.

४० वकिलांच्या गटाचा हल्ला
चितगाव कोर्टात आपल्यावर झालेल्या गैरवर्तनाचा संदर्भ देत रवींद्र घोष म्हणाले की, सुमारे ४० वकिलांच्या एका गटाने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांना दास यांचा खटला लढण्यासाठी कोणताही वकील नको आहे. हिंदू वकिलांवर खोटे खटले दाखल केले जात आहेत, जेणेकरून तेही मागे हटावे. त्यावेळी स्थानिक पोलिसांनी त्यांना वाचवले, मात्र बांगलादेशातील हिंदू वकील आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची कोणतीही हमी नसल्याचे घोष म्हणाले.


Powered By Sangraha 9.0