...तर बांगलादेशचे चार तुकडे करावे लागतील!

18 Dec 2024 17:56:36

Pravin Togadiya on Bangladesh

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Pravin Togadiya on Bangladesh)
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण भाई तोगडिया यांनी मंगळवारी बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचारावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार सुरुच राहिला तर बांगलादेशचे चार तुकडे करावे लागतील. अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. मंगळवारी उत्तर प्रदेशच्या हापूरमधील पिलखुवा येथे त्यांनी एका माध्यमांशी संवाद साधला.

हे वाचलंत का? : युनुस सरकारच्या सल्लागाराची वादग्रस्त पोस्ट; पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा बांगलादेशात दाखवण्याचा प्रयत्न

प्रवीण भाई तोगडिया पुढे म्हणाले, बांगलादेशात हिंदू सुरक्षित नाहीत. हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा हिंदूंची लोकसंख्या २८ टक्के होती, आता फक्त ८ टक्के शिल्लक राहिले आहेत. इस्लामिक कट्टरपंथींकडून होत असलेल्या अत्याचारामुळे तेथील हिंदूंना स्थलांतर करावे लागले आहे. भारत सरकारने दबाव आणून बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करावे. आपण एकेकाळी पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. आता बांगलादेशचे चार तुकडे करावे लागतील.

Powered By Sangraha 9.0