चीन व पाकिस्तान असे हे नाते

18 Dec 2024 21:58:33
 
 
China and Pakistan
 
चीन पाकिस्तानला मित्रराष्ट्र मानतो का? तर नाहीच. नुकतेच चीनने ‘व्हिसा फ्री पॉलिसी’अंतर्गत 54 देशांना सूट दिली. मात्र, त्यात पाकिस्तानचे नाव नाही. चीनच्या दृष्टीने पाकिस्तान मित्र नाही आणि काही कामाचाही देश नाही. भारताचा शेजारी आणि पारंपरिक द्वेष्टे राष्ट्र म्हणून चीन पाकिस्तानची तळी उचलत असतो. पाकिस्तानला हे कळते, पण चीनची हाजी हाजी करण्याशिवाय पर्याय तरी काय आहे?
 
चीन पाकिस्तानला मित्रराष्ट्र मानतो का? तर नाहीच. नुकतेच चीनने ‘व्हिसा फ्री पॉलिसी’अंतर्गत 54 देशांना सूट दिली. मात्र, त्यात पाकिस्तानचे नाव नाही. चीनच्या दृष्टीने पाकिस्तान मित्र नाही आणि काही कामाचाही देश नाही. भारताचा शेजारी आणि पारंपरिक द्वेष्टे राष्ट्र म्हणून चीन पाकिस्तानची तळी उचलत असतो. पाकिस्तानला हे कळते, पण चीनची हाजी हाजी करण्याशिवाय पर्याय तरी काय आहे?
 
नुकतेच चीनने 54 देशांतील नागरिकांना 54 प्रांतांच्या 60 मुक्त बंदरांच्या माध्यमातून प्रवेश करण्याची मुभा दिली. यामध्ये अमेरिका, कॅनडा, ब्राझील, मेक्सिको, अर्जेंटिना, चिली, बेल्जियम, चेक गणराज्य, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, जर्मनी, ग्रीस, युके, हंगेरी, इटली, युक्रेन आणि रशिया अशा अनेक पाश्चिमात्य देशांच्या नागरिकांना सवलत दिली.
 
या पॉलिसीचा संदर्भ ‘कोरोना’ काळाशी आहे. ‘कोरोना’मुळे जगभरात चीनची प्रतिमा खराब झाली. चीनच ‘कोरोना’चा जनक आहे, असा समज जगभरातल्या लोकांचा होता आणि आहे. जगभरातून ‘कोरोना’ने 2022 सालापर्यंत काढता पाय घेतला होता. मात्र, जगभरातून ‘कोरोना’ची दाहकता कमी होत असताना, चीनमध्ये ‘कोरोना’चा प्रकोप तितकाच वाढलेला होता. त्यामुळे चीनमध्ये कोणत्याही कारणाने येणार्‍या परदेशी पर्यटकांची संख्या खूपच कमी झाली. चीनच्या पर्यटनव्यवस्थेला याचा फटका बसला. चीनमध्ये पर्यटकांनी यावे म्हणून चीनने अनेक युक्त्या केल्या. त्यापैकीच ही ‘व्हिसा फ्री पॉलिसी.’ चीनला वाटते की, अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांतील नागरिकांना दुसर्‍या देशात जाण्यापूर्वी चीनमध्ये दहा दिवस राहण्याची मुभा दिली, तर त्या देशातील नागरिक चीनमध्ये येतील, राहतील डॉलर खर्च करतील. त्यामुळे देशाची आर्थिकता वाढेल. पण, चीनच्या या योजनेला अमेरिका आणि पाश्चात्य देशांतील नागरिक किती प्रतिसाद देतील, हे भविष्य काळातच कळेल.
 
मात्र, चीनने आशियातील केवळ सहा देशांतील नागरिकांना ही सुविधा आहे. यामध्ये रिपब्लिक ऑफ कोरिया, जपान, सिंगापूर, ब्रुनेई, संयुक्त अरब अमिराती आणि कतर देशाचा समावेश आहे. यामध्ये पाकिस्तान, भारत आणि बांगलादेशचे नाव नाही. भारत आणि बांगलादेशाशी चीनचे इतके सौख्य नाही. मात्र, पाकिस्तानचेही नाव नाही?
 
का? तर पाकिस्तानची प्रतिमा ‘दहशतवादी कुराष्ट्र’ म्हणून झालेली आहे. तसेच, अफगाणिस्तान पाकिस्तानच्या सीमेवर सातत्याने तालिबानी पाकिस्तानवर हल्ला करत असतो. त्यात पाकिस्तानमध्ये अंतर्गत गृहयुद्ध तर माजलेलेच आहे. अशीही पाकिस्तानची अवस्था चीनला माहीतच आहे. त्यामुळेच पाकिस्तानने चीनची कितीही भलावण केली, तरीसुद्धा चीनने पाकिस्तानशी संबंध एका सीमेपर्यंतच मर्यादित ठेवले आहेत.
 
मात्र, भूभाग विकासाच्या दृष्टीने संरक्षणाच्या दृष्टीने विकसित करतो, या बहाण्याने चीन पाकिस्तानमध्ये पाय रोवायचा प्रयत्न करतो.
पाकिस्तानने ग्वादर बंदराच्या बदल्यात चीनकडे आर्थिक मदत मागितली आहेच, त्याशिवाय पाकिस्तानने संरक्षण विषयात आत्मनिर्भर व्हावे, यासाठी चीनने मदत करावी, अशीही पाकिस्तानची मागणी आहे. मात्र, चीनने पाकिस्तानच्या या नव्या मागणीकडे कानाडोळा केला आहे. चीनला माहीत आहे, पाकिस्तान जाऊन जाऊन जाणार कुठे?
 
त्यामुळेच पाकिस्तानसारख्या इस्लामिक देशात चीनने त्यांच्या पाकिस्तानी मुस्लीम कर्मचार्‍यांसाठी नियमावली बनवली आहे. त्यानुसार पाकिस्तानी मुस्लीम कर्मचारी पाकिस्तानमधल्या चिनी कंपनीमध्ये कामाच्या वेळेस नमाज पढू शकत नाहीत किंवा पारंपरिक वेशभूषा, केशभूषा करू शकत नाहीत. कट्टरतावादी पाकिस्तानने चीनची ही नियमावली मान्य केली आहे, तर अशाप्रकारे पाकिस्तान चीनचा पूर्ण मांडलिक झालेला आहे.
 
अर्थात, पाकिस्तान्यांना चीनबद्दल कितीही अभिमान वाटला, तरीसुद्धा चीनच्या दृष्टीने पाकिस्तान हा वापरण्यासाठीचा भूभाग आहे. दुसरीकडे एक मात्र नक्की वाटते की, पाकिस्तानी नागरिकांनाही ‘व्हिसा फ्री पॉलिसी’अंतर्गत चीनमध्ये दहा दिवस राहण्याची मुभा दिली, तर काय होईल? सौदीमध्ये बहुसंख्य जास्त चोर आणि भिकारी हे पाकिस्तानी नागरिक होते. चीनला देशामध्ये चोर आणि भिकार्‍यांची संख्या वाढवायची नाही, असे तर नाही ना? चीनची पॉलिसी तर हेच सांगते.चीनच्या या अशा वर्तनाबद्दल पाकिस्तानला सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही
Powered By Sangraha 9.0