नागपूर : विधानसभा निवडणुकीत सर्वाधित लाडक्या बहिणींनी ( Ladkya Bahini ) महायुती सरकारला भरभरून मतदान केले. त्यामुळे नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात किती महिलांना संधी मिळते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार महिला आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे.
भाजपाने तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एका महिलेला मंत्रिमंडळात संधी दिली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आदिती तटकरे यांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपकडून माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.