‘पुष्पा २’ची गाडी सुसाट;, ६ व्या दिवशीही केली घसघशीत कमाई

11 Dec 2024 14:14:09
 
pushpa 2
 
 
मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांची प्रमुख भूमिका असणारा चित्रपट 'पुष्पा २' सध्या चित्रपटगृहांमध्ये अक्षरश: पैशांचा पाऊस पाडत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत ‘बाहुबली २’, ‘आरआरआर’, ‘जवान’, ‘पठाण’ अशा अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सहा दिवसांमध्ये देशभरात ६०० कोटींचा आकडा पार केला असून जगभरात ९०० कोटींचा पल्ला गाठला आहे.
 
सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, पुष्पा २ चित्रपटाने बुधवारी मध्यरात्री १०.६५ कोटी, गुरुवारी पहिल्या दिवशी १६४.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी ९३.८ कोटी, तिसऱ्या दिवशी ११९.२५ कोटी, चौथ्या दिवशी १४१.०५ कोटी, पाचव्या दिवशी ६४.४५ कोटी, सहाव्या दिवशी ५१.६ कोटी कमवून आत्तापर्यंत ६४४.८५ कोटींची कमाई केली आहे.
 
तसेच, सॅकनिल्कच्या माहितीनुसार, 'जवान' चित्रपटाचे लाइफटाईम इंडिया नेट कलेक्शन ६४०.२६ कोटी रुपये आहे, तर 'पुष्पा २' ने अवघ्या ६ दिवसांत या कलेक्शनला यशस्वीरित्या मागे टाकले आहे. इंडिया नेट कलेक्शनच्या बाबतीत 'कल्की २८९८ AD' ने ६४६.३१ कोटी, ‘आरआरआर’ने ७८२.२ कोटी, ‘केजीएफ २’ ने ८६९.७ कोटी, 'बाहुबली २'ने १०३०.४२ कोटी कमावले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0