कार्यकर्त्यांचा नादच खुळा! यावेळी तीन ठिकाणी झळकले 'अफजलखान वधा'चे भव्य फलक

11 Dec 2024 17:43:23

Jat News

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Afzal Khan Vadh Poster News) 
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व काही हिंदुत्ववादी संघटनांनी सांगली जिल्ह्यातील जत शहरात ‘अफझलखान वधा’चा भव्य फलक उभा केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासोबतच मंगळवार पेठ येथील मारुती मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि छत्रपती संभाजी महाराज चौक अशा तीन ठिकाणी प्रशासनाची अनुमती घेऊन यासारखेच फलक लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
जत शहरात दि. ८ डिसेंबर रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवप्रतापदिनानिमित्त ‘अफझलखानवधा’चा एक फलक लावण्यात आला होता, मात्र जत पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकार्‍यांनी हा फलक जप्त केला. हा फलक जप्त करताना तो फाडला गेल्याने या फलकाची विटंबना झाल्याचा दावा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. त्यामुळे सांगली जिल्ह्यात याप्रकरणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा अफझलखान वधाचा भव्य फलक झळकावल्याचे पाहायला मिळत आहे.
Powered By Sangraha 9.0