नाशिक : महाराष्ट्रातील नाशिक येथील पोलिसांनी शनिवारी ७ डिसेंबर २०२४ रोजी मीझान शेख, आयान शेख, आयेश शाह, शारिक शाह आणि फहीम शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू शौर्य दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी राम जन्मभूमी आयोध्या येथे उभा असलेला बाबरी ढाचा पाडण्यात आला होता. त्यामुळे हिंदू शौर्य दिनानिमित्त इंस्टाग्राम पोस्टवर स्टोरी शेअर करण्यात आली होती. त्यावेळी काही कट्टरपंथींनी संबंधित युवकावर हल्ला केला आहे.
पाच आरोपींनी तरुणाच्या घरावर दगडफेक केली होती. यासोबतच लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यात आली होती. ही घटना नाशिक येथील निफाड येथे घडली होती. इंस्टाग्राम येथे पोस्ट शेअर करण्यात आल्याचे पाहून पीडित मित्र मिजाज शेखने संताप व्यक्त केला. त्यावेळी पीडित युवकाने हा शौर्य दिन साजरा करत असून कोणताही एक जातीवाद निर्माण करत नाही असे त्याने सांगितले आहे. यानंतर आता आरोपीने पीडिताला शिवीगाळ करत हल्ला केला होता.
त्यावेळी दोघेही घटनास्थळावरून निघून गेले. काही तासांनंतर नयन हा आपल्या बहिणीला शाळेत घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी दरम्यान मिजाजने त्याला थांबवले असून त्याने अयान शेख, आयेश शाह, शारिक शाह आणि फहीम शेख यांच्यासह त्याच्या १५-२० साथीदारांना फोन करण्यात आला होता. त्यावेळी नयनने आपल्या चुलत भावाला संपर्क करत त्याचा चुलत भाऊ त्याल बेदम मारहाण केली.
पीडित नयनने आपल्या चुलत भावाला मदतीसाठी बोलवले. यानंतर त्याता चुलत भाऊ त्याला रुग्णालयात घेऊन गेला. दरम्यान, संधी साधून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. या संबंधित घटनेबाबत पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत जाऊन तक्रार केली आहे. भारतीय न्याय संहिता २०२४ अंतर्गत एससीएसटी कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.