मुस्लिमबहुल भागात महाविकास आघाडीसाठीच इव्हीएम कशा काय सेट होतात?

01 Dec 2024 17:19:52

EVM
 
मुंबई : मुस्लिमबहुल भागांमध्ये महाविकास आघाडीने इव्हीएम सेट कशा केल्या होत्या? असा सवाल आता महायुतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी केला आहे. बाबा आढाव यांनी इव्हीएम घोटाळ्यावर आरोप केला होता. त्यावर त्यांनी केलेल्या आरोपावर आता सदाभाऊ खोत यांनी प्रतिसवाल केला आहे.
 
ज्या मुस्लिमबहुल भागांमध्ये महायुतीला कशी काय कमी मते मिळतात. जनतेचा कौल पचवता आला नाहीतर काही लोक अशा पद्धतीच्या आरोपांचा आधार घेत असतात. मात्र या विज्ञान युगामध्ये अशा निराधार आरोपांमुळे लोकशाहीची विश्वसार्हता कमी होत नाही तर आरोप करणाऱ्यांची विश्वसार्हता कमी होत असते, असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी बाबा आढाल यांच्यावर पलटवार केला आहे.
 
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीने सर्वाधिक जागा जिंकत येत्या ५ तारखेला सत्ता स्थापन करणार असल्याची अधिकृत माहिती दिली आहे. मात्र आता महायुतीने एकहाती विजय मिळवल्याने महाविकास आघाडीने एव्हीएम घोटाळा केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. 
 
 
Powered By Sangraha 9.0