कट्टरपंथींच्या बँक खात्यात ८०० कोटी हस्तांतरीत, किरीट सोमय्यांकडून व्होट जिहाद प्रकरणाची पोलखोल

01 Dec 2024 13:59:54

vote jihad
 
मालेगाव : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी व्होट जिहाद (vote jihad) करत काही कट्टरपंथींच्या बँक खात्यात ८०० कोटी रूपये हस्तांतरित केले जात असल्याची माहिती दिली आहे. मालेगाव येथे व्होट जिहादच्या प्रकरणाची पोलखोल करत याप्रकरणात लक्ष घातले. त्यांनी X ट्विटरवर याप्रकरणाची माहिती शेअर केली आहे. यामध्ये एक-दोन नाहीतर तब्बल २१ बँक खात्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
याप्रकरणात सिराज मोहम्मद, अक्रम मोहम्मद, मामू, मोईन खान इस्माईल खान, सलमान शकील मिर्झा, नफिसा बाई, मोहम्मद साजिद आणि तर काही कट्टरपंथींसह दुबई येथे ५ व्यवसायिक कंपन्यांचा सहभाग असल्याची पोलखोल किरीट सोमय्या यांनी केली आहे.
 
 
 
दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मोठ्या प्रामाणात मुस्लिम मतांच्या माध्यमातून व्होट जिहाद करत त्यांना फायदा झाला असल्याचे त्यांनी याआधी वक्तव्य केले. तसेच त्यांनी सज्जाद नोमानी यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांचा फायदा झाला असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी संबंधित ट्विट करत पुन्हा एकदा व्होट जिहादचे प्रकरण उघडकीस आणले आहे.
 
Powered By Sangraha 9.0