हिंदू असण्याची जाणीव करून देणे गरजेचे : विश्वजीत देशपांडे

06 Nov 2024 16:43:12
Vishwajeet Deshpande

पुणे : ( Vishwajeet Deshpande ) “महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत हिंदूंमध्ये जातीजातींत फूट निर्माण करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहे व आजमितीला ‘बटोगे तो कटोगे’ एवढ्या गंभीर स्थितीत एकूणच हिंदू समाज पोहोचला आहे. अशा वेळी आपण आधी हिंदू आहोत.

ही जाणीव सर्वानाच करून देणे आवश्यक ठरते आणि ब्राह्मणांनी तर सर्वात आधी या हिंदू ऐक्याच्या कार्यात अग्रेसर असायला हवे. ही आपली जबाबदारीच नव्हे, तर कर्तव्य आहे,” असे मत ‘परशुराम हिंदू सेवा संघा’चे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी व्यक्त केले. तसेच, “परशुराम सेवा संघ’ आता ‘परशुराम हिंदू सेवा संघ’ असे नवीन नाव धारण करून हिंदू धर्माच्या सेवेसाठी पुढचे पाऊल टाकत आहे,” अशी माहिती ही त्यानी यावेळी दिली.

भगवान परशुराम हे भगवंताचे सहावे अवतार आहेत. या अवतारात भगवंतांनी जे कार्य केले, त्यात अन्यायावर प्रहार व कोकण भूमी जोडून जगातला पहिला रिकलेमेशन इंजिनिअर म्हणून त्यांनी काम केले. त्यातूनच प्रेरणा घेऊन आपण अवघा हिंदू बंधू जोडूया,” असेही ते म्हणाले.

Powered By Sangraha 9.0