अमेरिकन निवडणुकीचे भारतीय शेअर बाजारावर पडसाद; सेन्सेक्स ९०० अंकांनी वधारला

06 Nov 2024 16:44:58
us election result impacts on share market
 

मुंबई :        भारतीय शेअर बाजाराने दुपारच्या सुमारास मोठी उसळी घेतली असून सेन्सेक्स ९०१.५० अंकांनी तर निफ्टी २७०.७५ अंकांनी वधारला. दुपारच्या सुमारास अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाचा निकाल जाहीर होताच शेअर बाजारात सेन्सेक्स ८५९.४१ अंकांच्या वाढीसह ८०,३३६.०४ वर व्यवहार करत होता. त्याच वेळी, निफ्टी ५० देखील २५१.८० अंकांच्या वाढीसह २४,४६५.१० च्या पातळीवर पोहोचला.


दरम्यान, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतल्यानंतर बाजारात मोठी वाढ दिसून आली. भारतीय शेअर बाजारात आज म्हणजेच बुधवारी तेजी दिसून आली असून बाजारातील प्रमुख निर्देशांक(सेन्सेक्स, निफ्टी ५०) वाढीसह व्यवहार करताना दिसले. अमेरिकेन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतल्यानंतर ही वाढ दिसून आली. आशिया-पॅसिफिक प्रदेशात, बँक ऑफ जपान (BOJ) च्या चलनविषयक धोरण बैठकीचा परिणाम बाजारावर दिसून येईल.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांव्यतिरिक्त गुंतवणूकदारांचे सप्टेंबरच्या तिमाही निकालांवर बारीक लक्ष असणार आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, गुंतवणूकदारांनी व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. तसेच, जागतिक बाजारात यूएस फेडरल रिझर्व्ह पुढील दिवसांत नवीनतम धोरण विधान प्रसिद्ध करेल. कच्च्या तेलाच्या किमतीत घट होत असून ब्रेंट क्रूड ऑइल फ्युचर्स प्रति बॅरल ७५.१४ डॉलरवर स्थिरावले आहेत.







Powered By Sangraha 9.0