स्विगीचा आयपीओ सबस्क्रिप्शनकरिता खुला, ०८ नोव्हेंबर अंतिम मुदत, जाणून ग्रे मार्केट ट्रेंड
06-Nov-2024
Total Views |
मुंबई : देशातील फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने आयपीओ लाँच करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वाी केली होती. त्यानंतर आता दि. ०६ नोव्हेंबर पासून सबस्क्रिप्शनकरिता खुला करण्यात आला असून ०८ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना अप्लाय करता येणार आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून आयपीओ बाजारात सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे.
दरम्यान, सबस्क्रिप्शन कालावधी ८ नोव्हेंबरपर्यंत असणार असून आयपीओसाठी ३७१ रुपये ते ३९० रुपये प्रति शेअर किंमत बँड कंपनीने निश्चित केला आहे. यंदाच्या वर्षात ह्युंदाई मोटर इंडिया नंतर हा आयपीओ दुसरा सर्वात मोठा आयपीओ असून भारतातील सहावा सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. कंपनीने ११५,३५८,९७४ शेअर्सचा ताजा इश्यू व १७५,०८७,८६३ शेअर्सच्या विक्रीची ऑफर्सचा समावेश आहे.
तब्बल ११,३२७ कोटी रुपये बाजार भांडवल आयपीओच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. बाजार तज्ज्ञांकडून आयपीओ संदर्भात वेगवेगळी मतमतांतरे दिसून येत आहे. झोमॅटोच्या तुलनेत किंमत/विक्री, ईव्ही/विक्री आणि पी/बीव्ही गुणकांवर स्विगीचे मूल्यांकन संतुलित आणि आकर्षक आहे, असे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.
तर दुसरीकडे, स्विगी आयपीओ दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी एक सुवर्णसंधी आहे, असे एसबीआय विश्लेषकांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. त्याचबरोबर, शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, स्विगीचा आयपीओ जीएमपी म्हणजे ग्रे मार्केट प्रीमियम १२ रुपयांवर व्यापार करत होता. तर ३९० प्रति शेअरच्या प्राइस बँडच्या तुलनेत ४०२ रुपये प्रति शेअरवर व्यापार करत आहे.