रविंद्र चव्हाण यांना पुरोहित मंडळाचा जाहीर पाठिंबा

यशस्वी भव, म्हणत दिले शुभाशीर्वाद

    06-Nov-2024
Total Views |
Ravindra Chavan

डोंबिवली : ( Ravindra Chavan ) आपले सांस्कृतिक, अध्यात्मिक शहर आणि महायुती यांचा वैचारिक डीएनए एकच आहे. समस्त डोंबिवलीकर महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. डोंबिवलीतील देशस्थ शुक्ल यजुर्वेदीय पुरोहितांचे वेद विज्ञान मंडळातील सर्व सभासदांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना संपूर्ण पाठिंबा दर्शवला. आपण प्रचंड मताधिक्याने निवडून याल, असे सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केला.

पुढील सामाजिक कार्यासाठी जय, यश, बल लाभो असे आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. “या शुभाशीर्वादांमुळे निवडणूक लढविण्यासाठी शंभर हत्तींचे बळ मिळाले,” अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी व्यक्त केली. पुरोहित मंडळाचे अध्यक्ष वेदमूर्ती अमोल विजय कुलकर्णी, संतोष पुराणिक, कोदंडपाणी कुलकर्णी, लक्ष्मण पारेकर, केदार पारेकर, राहुल शुक्ल, महेश जोशी, दिनेश उपासनी, यज्ञेश जोशी, कपिल भंडारी, सार्थक आराध्ये, श्रीपाद कुलकर्णी आदी सभासद उपस्थित होते.

डोंबिवलीत कमळच फुलणार! शहरातील रामनगर येथील विविध संस्था आणि सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांची बैठक रामनगरमधील राजस्थान ‘जैन संघ हॉल’ येथे संपन्न झाली. बैठकीत ‘श्री राजस्थान जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ’, ‘लोहाणा समाज’, ‘यादव समाज’, ‘बिलावल असोसिएशन’, ‘युवा आशापुरा मंडल’ आदी संस्थांचा सहभाग होता. बैठकीदरम्यान उपस्थितांशी संवाद साधला. तसेच त्यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.

सी.ए. जय जैन आणि अ‍ॅड. रोहन देसाई या युवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी डोंबिवलीत कमळच फुलणार असल्याचे सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केला. बैठकीला माजी नगरसेवक भाई देसाई, मंदार हळबे, मुकुंद पेडणेकर, माजी अध्यक्ष गिरीश साठे, युवा मोर्चा प्रदेश सचिव मिहिर देसाई, आशिष मौर्य, सिद्धांत घुले, सुनील वेताळ, स्वानंद भणगे आदी भाजप पदाधिकारी तसेच किरण राजजी राणावत, प्रमोद ठक्कर, राजबहादूर यादव, लल्लन यादव, तगदराज राणावत, भावेश जैन, प्रदीप जैन, दिलीप कोठारी, सुखलाल जैन, तेजराज जैन आदी प्रमुख संस्था पदाधिकारी उपस्थित होते.