आमदार केळकर हे खर्‍या अर्थाने जनसेवक

06 Nov 2024 14:18:58
sk

ठाणे : दिवाळी संपताच ठाणे शहर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांनी आपल्या प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. त्यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन नुकतेच झाले. मंगळवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळीच त्यांनी कचराळी तलाव येथे मॉर्निंगवॉकला येणार्‍या ज्येष्ठ, तरुण, महिला वर्ग यांच्याशी संवाद साधला. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे यावेळी जोरदार स्वागत केले. केळकर हे खर्‍या अर्थाने जनसेवक असल्याचेही अनेकांनी यावेळी बोलून दाखविले.

भाजपचे संजय केळकर हे ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून तिसर्‍यांदा निवडणूक लढवित आहेत. त्यानुसार आता त्यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. मंगळवारी, दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता त्यांनी थेट कचराळी तलाव परिसराला भेट दिली. यावेळी येथे मॉर्निंगवॉकसाठी येणार्‍या ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी आणि महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, सुभाष काळे आदींसह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.

मॉर्निंगवॉकसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. तसेच, त्यांच्याशी गप्पा मारल्या. या निवडणुकीत आपला निर्धार जनसेवक संजय केळकर हेच असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले. ठाणे शहरातील विकास कामांसह इतर सोई-सुविधा कशा उपलब्ध करून दिल्या जातील, यावर त्यांनी दृष्टीक्षेप टाकला.

Powered By Sangraha 9.0