मुंबई : समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्त ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी- राज्यस्तरीय खुली लेखन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा जिल्हा आणि राज्य अशा दोन स्तरांवर होणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांतून जिल्हास्तरीय विजेते निवडले जातील. या जिल्हास्तरीय विजेत्यांमधूनच राज्यस्तरीय विजेते निवडले जाणार आहेत. अहिल्यादेवी- न्यायप्रिय, आदर्श प्रशासक व समाज सुधारक, अहिल्यादेवींचे धर्मकार्य व राष्ट्रीय दृष्टीकोन, अहिल्यादेवी होळकर- भारतीय स्त्री चिंतनाच्या आदर्श, अहिल्यादेवींचे जीवनकार्य- आजच्या युगातील प्रासंगिकता, अहिल्यादेवी आणि पारंपारिक स्थापत्य आणि कला विकास असे या स्पर्धेचे विषय आहेत. या स्पर्धेसाठी लेख पाठविण्याची अंतिम तारीख १० जानेवारी आहे. लेखाची शब्द मर्यादा ८०० ते १००० शब्द शब्द आहे. राज्यपातळीवर प्रथम पारितोषिक १०,००१ रुपये, द्वितीय पारितोषिक ७००१ रुपये, तृतीय पारितोषिक ५००१ रुपये आणि उत्तेजनारार्थ पारितोषिक (५ जणांना) ३००१ रुपये आहे. जिल्हापातळीवर प्रथम पारितोषिक २००१ रुपये, द्वितीय पारितोषिक १५०१ रुपये, तृतीय पारितोषिक १००१ रुपये आणि उत्तेजनारार्थ पारितोषिक (५ जणांना) ५०१ रुपये आहे. या स्पर्धेसंबंधी अधिक माहिती ‘https://www.facebook.com/samarasatasp?mibextid=LQQJ4d’ या समरसता साहित्य परिषदेच्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे.