‘समरसता साहित्य परिषदे’तर्फे ‘राज्यस्तरीय खुली लेखन स्पर्धा’

06 Nov 2024 14:43:21
AH

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त ‘समरसता साहित्य परिषद’, महाराष्ट्रतर्फे ‘राज्यस्तरीय खुली लेखन स्पर्धा’ ( Writing Competition ) आयोजित करण्यात आली आहे. “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे धार्मिक सामाजिक आणि राजकीय नेतृत्व कालातीत आहे. त्यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त परिषदेतर्फे राज्यस्तरीय खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यास आम्हाला आनंद होत आहे,” असे मत समरसता परिषदेचे कार्याध्यक्ष प्रसन्न पाटील यांनी व्यक्त केले.

लेख मराठी भाषेतूनच असावा. तसेच लेखाची शब्द मर्यादा 8०० ते १००० शब्द असावी. लेख पूर्ण टाईप करून त्यावर आपले नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि जिल्हा लिहून samarasatamah@gmail.com या ईमेलवर दि. १० जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ पर्यंत पाठवावा, असे आयोजकांनी नमूद केले आहे.

ही स्पर्धा प्रथम जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात येत असून त्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ विजेते निवडण्यात येतील. पुढे जिल्हास्तरीय विजेत्या स्पर्धकांमधून राज्यस्तरीय विजेते निवडले जाणार आहेत.

राज्य पातळीवर पारितोषिक रक्कम ही प्रथमसाठी ७ हजार, ००१, द्वितीयसाठी ५ हजार, ००१, तृतीयसाठी ३ हजार, ००१ आणि उत्तेजनार्थ (५ जण) एक हजार, ००१ अशी आहे. तसेच जिल्हा पातळीवर प्रथमसाठी २ हजार, ००१, द्वितीयसाठी १ हजार, ५०१, तृतीयसाठी एक हजार, ००१ आणि उत्तेजनार्थ (५ जण) ५०१ रुपये असे आहेत. स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी समरसता साहित्य परिषदेच्या https://www.facebook.com/samarasatap?mibextid=LQQJ4d या फेसबुक पेज बुकवर माहिती मिळेल, असे आयोजकांनी सांगितले आहे.

स्पर्धेसाठी विषय आहेत
  • अहिल्यादेवी-न्यायप्रिय, आदर्श प्रशासक व समाज सुधारक

  • अहिल्यादेवींचे धर्मकार्य व राष्ट्रीय दृष्टिकोन

  • अहिल्यादेवी होळकर-भारतीय स्त्री चिंतनाच्या आदर्श

  • अहिल्यादेवींचे जीवनकार्य-आजच्या युगातील प्रासंगिकता.

  • अहिल्यादेवी आणि पारंपरिक स्थापत्य आणि कला विकास


Powered By Sangraha 9.0