विकीपिडीयाचा पक्षपातीपणास केंद्र सरकारची नोटीस

06 Nov 2024 19:00:57
Wikipedia

नवी दिल्ली : केंद्र सरकारने विकीपिडीया ( Wikipedia ) या परदेशी माध्यममंचास त्याच्या कार्यशैलीविषयी नोटीस बजावली आहे. ऑपइंडिया या प्रसारमाध्यमाने विकिपीडियाच्या भारतविरोधी भूमिकेबद्दल तपशीलवार डॉजियर जारी केल्यानंतर काही दिवसांनी केंद्र सरकारने या परदेशी प्लॅटफॉर्मला नोटीस जारी केली आहे. त्याचवेळी दिल्ली उच्च न्यायालयाने एएनआयला सरकारचे प्रचाराचे साधन म्हणून संबोधल्याबद्दल विकिपीडियाला फटकारले आहे. स्वत:ला विश्वकोश म्हणू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे.

सरकारने जारी केलेली नोटीस विकिपीडियावर प्रदर्शित होत असलेल्या मोठ्या प्रमाणात चुकीची आणि पक्षपातीपणाची अनेक उदाहरणे अधोरेखित करते. नोटीशीत असे म्हटले आहे की लोकांच्या एका लहान गटाकडे प्लॅटफॉर्मच्या सामग्रीवर संपादकीय नियंत्रण आहे. विकिपीडियाला मध्यस्थ न मानता प्रकाशक म्हणून का मानले जाऊ नये, असा सवाल सरकारने केला आहे.
त्याचवेळी, विकिपीडियाच्या वेबसाइटवर भारतीय वृत्तसंस्था एएनआयला सरकारचे प्रचाराचे साधन म्हणून संबोधल्याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने गत शुक्रवारी एएनआयच्या विकीपिडीया पृष्ठावरील अपमानास्पद संपादने काढून टाकण्याच्या मागणीत अडथळा आणल्याबद्दल विकीपिडीयास फटकारले होते.

Powered By Sangraha 9.0