दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांविरोधात बुलडोझर कारवाई

06 Nov 2024 18:47:35
terrorism

नवी दिल्ली : ( Jammu-Kashmir ) जम्मू-काश्मीरमध्येही दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांवर बुलडोझरची कारवाई करण्यात येणार आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांची घरे जमीनदोस्त केली जातील, असा इशारा जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिला आहे. या कारवाईबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी श्रीनगरमध्ये राबता-ए-आवाम नावाच्या सार्वजनिक कार्यक्रमात हा इशारा दिला आहे. ते म्हणाले, दहशतवादी ओळखणे हे केवळ प्रशासन किंवा सुरक्षा दलांसाठीचे काम नाही. हे जनतेचे काम आहे आणि तिघांनी मिळून ठरवले तर दहशतवाद संपायला एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. आपल्या देशात असे लोक आहेत जे दहशतवादाचे समर्थन करतात आणि आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगतात, हे योग्य नाही. जनता जर दहशवाद्यांविरोधात उभी राहिली नाही तर काश्मीरचे कधीच बदलणार नाही, असेही ते म्हणाले.

आपल्या भाषणात नायब राज्यपालांनी दहशतवादाच्या सूत्रधारांना इशारा दिला. ते म्हणाले, निरपराधांना छेडू नका, दोषींना सोडू नका असे आपले धोरण आहे. जर कोणी दहशतवाद्याला आश्रय दिला तर त्याचे घर जमीनदोस्त केले जाईल. या कारवाईविषयी कोणत्याही प्रकारची त़डजोड करण्यात येणार नसल्याचेही नायब राज्यपालांनी स्पष्ट केले आहे.

Powered By Sangraha 9.0