खेळते भांडवल उपलब्धतेसाठी केंद्राचा मोठा निर्णय; 'एफसीआय'मध्ये समभाग गुंतवणूक

06 Nov 2024 18:34:40
fci share investment central govt decisdios


मुंबई : 
     कृषी क्षेत्राला चालना देता यावी देशभरातील शेतकऱ्यांचे कल्याण सुनिश्चित करता यावे याकरिता केंद्रीय मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. २०२४-२५ आर्थिक वर्षात भारतीय अन्न महामंडळा(एफसीआय)ने १० हजार ७०० कोटी रुपयांच्या समभाग गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळात बैठकीत खेळते भांडवल उपलब्धतेसंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.


दरम्यान, आर्थिक व्यवहार विषयक समितीने भारतीय अन्न महामंडळाला समभाग गुंतवणुकीला चालना देताना केंद्र सरकारने उचललेल्या या धोरणात्मक पावलामुळे भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात आले. सद्यस्थितीत भारतीय अन्न महामंडळ अल्पमुदतीच्या कर्जाचा आधाराने आपल्याला आवश्यक निधीच्या गरजेमधील दरी भरून काढण्यास मदत होणार आहे.

समभागामधील ही गुंतवणूक म्हणजे भारतीय अन्न महामंडळाला आपली ध्येय उद्दिष्टांची पूर्ण कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे पूर्ण करता यावीत, यादृष्टीने महामंडळाची क्षमता वाढावी या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. किमान आधारभूत मूल्याने होणारी अन्‍नधान्‍याची खरेदी आणि भारतीय अन्न महामंडळाच्या कार्यान्वय क्षमतावृद्धीसाठी गुंतवणुक अशा दुहेरी वचनबद्धतेनुसार केंद्र सरकार कार्यरत आहे.








Powered By Sangraha 9.0