चहाप्रेमींच्या खिश्यावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता; प्रतिकूल हवामानामुळे गुणवत्तेवर परिणाम

06 Nov 2024 11:52:55
bad-weather-spoils-the-taste-of-sipping-tea
 

मुंबई :          प्रतिकूल हवामानाचा फटका आता चहा प्रेमींना बसण्याची शक्यता आहे. देशभरातील चहा प्रेमींना चहाकरिता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. चहा उत्पादन क्षेत्रातील प्रमुख कंपनी टाटा कन्झ्युमरने यासंदर्भात भाष्य केले आहे. प्रतिकूल हवामानामुळे चहाच्या घाऊक किमती वाढल्या असून चहा कंपन्यांकडून किमतीत वाढ केली जाणार आहे. एकंदरीत, डिसेंबर तिमाहीत किमतीत वाढ सुरू केली असून त्यात कितपत वाढ होते, हे पाहावे लागेल.
दरम्यान, टाटा कन्झ्युमर, हिंदुस्थान युनिलिव्हर यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांकडून चहा दरवाढीचे संकेत देण्यात आले आहेत. याचा परिणाम म्हणून टाटा व हिंदुस्थान युनिलिव्हर यांना किमती वाढवाव्या लागल्या आहेत. तसेच, आगामी काळात भाव आणखी वाढण्याचे चिन्हे आहेत. २०२४-२५ मध्ये सप्टेंबरपर्यंत उत्तर भारतातील चहाची सरासरी लिलाव किंमत २४७.३३ रुपये प्रति किलो इतकी होती, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २३.९८ टक्के वाढ झाली आहे.

प्रतिकूल हवामानामुळे चहाची चव खराब होण्याची शक्यता जास्त असते. याचा परिणाम चहा उत्पादन कमी होण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे चहाच्या दरात आगामी काळात वाढ होऊ शकते. अनियमित हवामानाचा परिणाम चहा आणि मिठाच्या उत्पादनावर झाला असून इनपुट खर्चावर प्रभाव पडत आहे. याचा परिणाम ग्राहकांच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे, असे कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे.




Powered By Sangraha 9.0