मुंबई : रांगोळी, कंदील, दिव्यांची आरास करीत कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मंगळवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी महायुतीचे उमेदवार अतुल भातखळकर ( Atul Bhatkhalkar ) यांचे स्वागत केले. मंगळवारी सायंकाळी कांदिवलीतील वॉर्ड क्र. ४४ मध्ये रथयात्रा काढण्यात आली. यावेळी भाजपचे विधानसभा अध्यक्ष अप्पा बेलवलकर, विधानसभा प्रभारी सुधीर शिंदे, मुंबईचे सचिव ज्ञानमूर्ती शर्मा, माजी नगरसेवक आणि विधानसभा समन्वयक एकनाथ शंकर हुंडारे, माजी नगरसेवक संगीता शर्मा, दक्षा पाटील, महायुतीचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. गल्लो-गल्लीच्या रस्त्यांनी फिरणाऱ्या या रथयात्रेला अबाल-वृद्धांनी हजेरी लावली. रथयात्रेत सामील होणाऱ्या उत्साही लोकांनी अतुल भातखळकर यांच्या स्वागताला रांगोळी, कंदील, दिव्यांची आरास केलेली दिसत होती. ‘अतुलजी आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
रथयात्रेला जनतेचा उदंड प्रतिसाद
सोमवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी कांदिवलीतील वार्ड क्रमांक २७ मध्ये साई मंदिर परिसरातून काढण्यात आलेली रथयात्रा मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत आणि विविध घोषणांच्या जल्लोषात पार पडली. याप्रसंगी अतुल भातखळकरांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "कांदिवलीतील जनतेने या रथयात्रेला मोठा प्रतिसाद दिला आहे. उत्तर मुंबईतील सहाही जागांवर महायूतीच्या उमेदवारांचा विजय होणार आहे. विरोधकांनी जनतेला जात, प्रांत, भाषेच्या मुद्यावर वाटण्याचा आणि भेदभाव मूळ काँग्रेसी व्यवसाय आता बंद करावा. या व्यवसायामुळेच २५ वर्षांपासून गुजरातमध्ये काँग्रेस जिंकू शकली नाही."
मनात सेवाभाव ठेवून जनतेची कामे केली
"मी १० वर्षे कुणाचीही जात, पंथ, भाषा, मजहब, पक्ष यातलं काहीही न बघता सेवाभावाने जनतेची कामं केलीत. त्यामुळे मराठी, गुजराती, उत्तर भारतीय हे सगळेच बांधव माझ्या सोबत आहेत. यावेळी बऱ्याच लोकांनी फुलांचा वर्षाव करत माझं स्वागत केलं. तसेच 'अतुलजी फिरसे' अशा रांगोळ्या काढल्या. जनतेचं हे प्रेम बघून मला खूप आनंद होत आहे," अशा भावना भातखळकर यांनी व्यक्त केल्या.