मुंबई : मतदारांशी बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. भाजपकडून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून काँग्रेसचा हात, मतदारांचा घात, अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे.
हे वाचलंत का? - कांदिवली पूर्वमध्ये अतुल भातखळकरांच्या रथयात्रेला जनतेचा उदंड प्रतिसाद!
"कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार मतदारांना हरा*खोर म्हणत आहेत. २० तारखेनंतर तुला पाहून घेइन, तुमचे नाव लिहून ठेवले आहेत, अशी धमकीच त्यांनी मतदारांना दिली आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो मात्र लोकशाही, संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा काँग्रेसला सुरुवातीपासूनच तिटकारा आहे. ज्या काँग्रेसने संविधानाची पायमल्ली करत देशावर आणीबाणी लादली, असंख्य सामान्य लोकांना तुरूंगात डांबून ठेवले ती काँग्रेस पुन्हा मतदारांना धमकवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राची जनता मतदानातून काँग्रेसची ही मस्ती नक्कीच उतरवणार," असे भाजपने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.