दिल्ली : प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचे मंगळवार ५ नोव्हेंबर रोजी निधन झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. २०१७ पासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या.
शारदा सिन्हा यांनी भोजपुरी आणि मैथिली भाषेत अनेक लोकगीते गायली. काही हिंदी सिनेमानांहि त्यांनी आपला आवाज दिला आहे. १९९१ मध्ये त्यांना पद्मश्री आणि २०१८ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘बिहार कोकिळा’ म्हणून त्यांची ओळख आहे.