संजय केळकर यांच्या प्रचार रॅलीचा झंझावात..

06 Nov 2024 19:13:14
SK

ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा निवडणुक लढविणाऱ्या भाजप महायुतीचे उमेदवार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांच्या प्रचार रॅलीला मंगळवार पासुन सुरवात झाली. सांयकाळी ६ वा. निहारीका सोसायटी मेन गेटपासून सुरु झालेली ही रॅली रात्रौ १० वा. गौरव स्वीट कॉर्नर येथे समाप्त झाली. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, भाजपाचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत विविध संस्था आणि सोसायटया तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सामील झाले होते.

ठाणेकरांनो चला... एकजुटीने पुन्हा लढू, ठाण्यात कमळ फुलवू असा विश्वास देत मंगळवारी सांयकाळी ६ वाजता या प्रचार रॅलीला सुरवात झाली. निहारीका सोसायटी मेन गेट पासून या रॅलीला सुरवात झाली. त्यानंतर ही रॅली आशर एज, वसंधुरा सोसायटी, वसंत विहार सर्कलहून पुढे, लोकउपवन फेज १, लोकवृक्ष सोसायटी, धर्मवीर नगर नाका, तुळशीधाम, हिरानंदानी मेडोज, इडन वूज कॉम्प्लेक्स, गार्डन इस्टेट, हिला र्गाडन, कोकणीपाडा, कल्पतरु हिल्स, सुभाषचंद्र बोस चौक मार्ग, अ‍ॅक्मे ओझॉन , दोस्ती एम्पिरीया, बिकानेर स्विट मार्टकडून डावीकडे, सोहम गार्डन, शुभारंभ कॉम्प्लेक्स, हॅप्पी व्हॅली, कृष्णा नगर नाका, हिल क्रिस्ट, मुल्ला बाग, सत्यशंकर कॉम्प्लेक्स, निळकंठ ग्रीन, निळकंठ वुड्स, कॉसमॉस लॉज आणि गौरव स्वीट येथे रॅली समाप्त झाली. यावेळी भाजपच्या पदाधिकाºयांनी मोठ्या संख्येने या रॅलीत हजेरी लावल्याचे दिसून आले.

तसेच ही रॅली ज्या ज्या भागातून जात होती, त्याठिकाणी केळकर यांचे जोरदार स्वागत केले जात आहे. महिलांनी देखील त्यांचे औक्षण केले आणि विजयीभव असे आर्शिवाद दिल्याचे दिसून आले. तर कुठे फटाक्यांची आतषबाजी करीत केळकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. प्रचाराच्या या पहिल्या टप्यात टिकुजीनीवाडी परिसर, कोकणीपाडा, निळकंठ परिसर या भागात असलेल्या सोसायटी आणि इतर भागांना केळकर यांनी रॅलीच्या माध्यमातून भेटी देत, येथील नागरीकांचा पाठींबा मिळविल्याचे दिसून आले. रॅलीत ज्या ज्या ठिकाणी केळकर जात होते, त्या ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत केले जात होते. कुणी औक्षण करीत होते, तर अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पहिल्याच प्रचार रॅलीत केळकर यांच्यावर मतदारांनी विश्वास टाकल्याचे दिसून आले.

दिघेंच्या तालमीतील ज्येष्ठ नेत्यांचा केळकरांना आशिर्वाद

ठाणेकरांचे दैवत धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या तालमीत घडलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सतीश प्रधान आणि रघुनाथ मोरे यांची भाजप महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांनी बुधवारी भेट घेतली. दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी केळकर यांना विजयी भव असे आशिर्वाद दिले.

Powered By Sangraha 9.0